चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे आज ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये रफिक रशिद कुरेशी (स्वराज्य शक्ती सेना), सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष), सचिन अरूण सिद्धे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज विहीत वेळेत १२ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २४ नामनिर्देशन पत्रे नेली असून थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आतापर्यंत एकूण ६५ व्यक्तींनी एकूण १४२ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील..
शंकर पांडुरंग जगताप (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर महादु भोंडवे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), ऍड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रविराज बबन काळे (आम आदमी पार्टी), खाजाभाई खाडेलाल नदाफ (स्वराज शक्ती सेना) संतोष नागोराव सोनोने (बहुजन समाज पार्टी), तुकाराम महादू भोंडवे (भारतीय राष्ट्रीय पक्ष), संदेश दत्तात्रेय नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रतिक संदेश नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मयुर कैलास जयस्वाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गौरव शिवाजी चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), जितेंद्र प्रकाश मोटे (वंचित बहुजन आघाडी), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), गणेश सुरेश जोशी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), तुषार उर्फ वेंकटेश गाडे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष), विठ्ठल उर्फ नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष), अमोल लक्ष्मण डंबाळे (बहुजन समाज पार्टी), सुनील रमेश जावळे ( वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र आत्माराम पवार (वंचित बहुजन आघाडी), सायली किरण नढे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), सुभाष गोपाळराव बोधे (जनता दल धर्मनिरपेक्ष), गंगुबाई सुभाष बोधे (जनता दल धर्मनिरपेक्ष), प्रविण अशोक कदम (संभाजी ब्रिगेड), अनिल श्रीपती सोनवणे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), आनंद सुरेश मोळे (हिंदूराष्ट्र संघ), आशा अरूण पवार (संभाजी ब्रिगेड), राहुल निवृत्ती मदने (बहुजन समाज पार्टी).
अपक्ष – निलेश शिवाजी रावडे, अरूण श्रीपती पवार, ॲड. संदीप गुलाब चिंचवडे, हरी तापीराम महाले, रफिक रशीद कुरेशी, संतोष श्रीमंत फुलारे, सचिन अरूण सिद्धे, नंदू गोविंद बारणे, अनिल विष्णूपंत देवगावकर, मयूर बाबू घोडके, विनायक सोपान ओव्हाळ, शिवाजी तुकाराम पांडूळे, सचिन वसंत सोनकांबळे, राहुल अभिमान राऊत, सिद्धीक ईस्माइल शेख, सतिश भास्कर काळे, रविंद्र विनायक पारधे, डॉ. अक्षय गंगाराम माने, जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु, राजेंद्र मारूती काटे, विशाल नंदू वाघमारे, कासिम राजासाब बागवान, भाऊसाहेब सोपानराव भोईर, अतुल गणेश समर्थ, चंद्रकांत बारकू नखाते, करण नानासाहेब गाडे, शत्रुघ्न सिताराम काटे, रुपेश रमेश शिंदे, शितल विठ्ठल काटे, मारुती साहेबराव भापकर, मिलींद मोहन फडतरे, सिमा देवेंद्रसिंग यादव, बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, धर्मराज अनिल बनसोडे, ऍड. राजु पाटील, संजय सुधाकर भोंडवे, अजय सुधाकर गायकवाड, राणी विशाल वाघमारे.