पुनावळे येथील सोसायटी धारकांनी व्यक्त केल्या भावना; कचरा डेपोची समस्या सोडवल्याबद्दल पुनावळे वासीयांनी मानले आमदार अश्विनी जगताप यांचे आभार
चिंचवड (Pclive7.com):- पुनावळे गावचा स्मार्ट विकास करण्यासाठी स्मार्ट व्हिजन असणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच या भागाचे आमदार असावेत. त्यासाठी आम्ही पुनावळेतील सर्व सोसायटी धारक एकदिलाने शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन पुनावळे गावातील सोसायटी धारकांनी दिले. तसेच पुनावळे वासियांची सर्वांत मोठी कचरा डेपोची समस्या आमदार अश्विनी जगताप यांनी सोडविली. आणि त्यासाठी शंकर जगताप यांनीही नियोजनबद्ध पाठपुरावा केल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथील सोसायट्यांमध्ये आमदार अश्विनी जगताप यांनी दौरा केला. या प्रचार दौऱ्यात अश्विनी जगताप यांनी पुनावळेमधील ट्वीन आर्क सोसायटी, श्रेयांश सोसायटी, जीके रोज मेन्शन, सरिशा, वि जे यशवन इन्फिनिटी, लेगसी उर्बनिया, पुणेवीले, सोमानी ड्रीम् होम, आकाशवन, वर्धमान पाम रोज, स्टांझा यासह अनेक सोसायट्यांना भेट देऊन तेथील रहिवाशांसोबत संवाद साधला.
यावेळी सोसायटी धारक म्हणाले की, ज्या पद्धतीने आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे येथील सर्वात गहन कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागला, त्याबद्दल पुनावळे गावातील प्रत्येक नागरिक तुमचा आभारी आहे. आणि यापुढेही पुनावळे गावातील सर्व समस्या सोडवून गावाचा स्मार्ट विकास करण्यासाठी पुनावळे गावातील आम्ही सर्व सोसायटीधारक एकदिलाने आणि एकजुटीने शंकर जगताप यांच्यासोबत आहोत, असा विश्वास उपस्थित सर्व सोसायटीधारकांनी अश्विनी जगताप यांना दिला.
या दौऱ्या दरम्यान शिक्षण मंडळ माजी सभापती चेतन भुजबळ, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजीव क्षीरसागर, सुरेश रानवडे, नवनाथ ढवळे, विठ्ठल बरळ, सौरभ बिडवाई, अजित भोसले, अनिल वांबोरी, मुनमुन पोदार, ट्विन आर्क सोसायटीचे चेअरमन सचिन भोसले, अशोक हराळे, विवेक पाटील, श्रीकांत गायकवाड, विजय टंडन, संकेत शर्मा, अमित खांडवे, श्रीयांस सोसायटीचे चेअरमन हर्ष मालवी, अजय निकम, अमित नवबते, सरिशा सोसायटीचे विनायक थोरात, विष्णू मोहिते, हितेश बांदल, गणेश कदम, अंशुमन दुबे, श्रेया १,२ सोसायटीचे विनायक गावडे, स्वप्निल भामरे, प्रसाद कुलकर्णी, विकास सूर्यवंशी, जीके रोज मेन्शन सोसायटीचे लक्ष्मण व्यवहारे, कुशाग्र शर्मा, सेंटोसा सोसायटीचे सुरेश कोल्हे, चंद्रकांत महाजन, श्री,सोनार, श्री.पांढरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.