पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी करंडक २०२४ (पर्व ५वे) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवमहाराष्ट्र क्रीडांगण येथे करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी परिसरातील क्रीडा प्रेमींसाठी पिंपरी करंडक २०२४ (पर्व ५ वे) या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक २२ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधी मध्ये करण्यात आले असून खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी कै .सौ. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ १,५१,००० व चषक द्वितीय क्रमांकासाठी कै.सौ. सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ १,००,००० व चषक, तृतीय क्रमांकासाठी कै.श्री. दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ ५१,००० व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी कै.श्रीम.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ २५,००० व चषक तसेच ४० वर्षावरील क्रिकेट संघांसाठी कै.योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ ३५,००० व चषक.
तसेच कै. संतोष नामदेवराव जाधव यांच्या स्मरणार्थ २५,००० व चषक कै. श्री.निलेश गुलाबराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ १५,००० व चषक कै. श्री.राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ १०,००० व चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास १२ टी-शर्ट देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी श्री.संदीप नाणेकर ९०११०३२७७६ व श्री.राजेंद्र वाघेरे ९९२२८६३८९३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.