पिंपरी (Pclive7.com):- फास्टट्रॅक कंपनीची बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील डायमंड वॉच या दुकानामध्ये करण्यात आली.
गौरव शामनारायण तिवारी (३८, रा. नवी दिल्ली) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुकानदार विनोद लीलाचंद जैन (५८, रा. देहूरोड), दुकानातील कामगार काशिनाथ उर्फ बापू प्रभाकर चव्हाण (२६, रा. देहूरोड) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गौरव तिवारी हे फास्टट्रॅक कंपनीमध्ये काम करतात.