पिंपरी (Pclive7.com):- “एकच ब्रँड ठाकरे ब्रँड”.. अशी घोषणाबाजी करत पिंपरीत (दि.०६) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेचा विजय उत्सव साजरा केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठी भाषेचा विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एकमेकांना पेढे भरवून व फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकच ब्रँड ठाकरे ब्रँडच्या घोषणांनी परिसर गजबजून गेला होता.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, मनसे शहरप्रमुख सचिन चिखले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.