पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर मधील एका शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांवर शस्त्राने वार झाले आहेत. मोटु म्हणून का चिडवतो या कारणावरुन हे भांडण झाले. त्यातून पुढे वाढलेल्या भांडणात मध्यस्थी करणारा विद्यार्थी जखमी झाला आहे.

पिंपळे सौदागर विभग्योर शाळेबाहेर ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. मला मोटु का चिडवतो? यावरुन काल दोन मित्रांमध्ये वाद झाले होते. चिडवणाऱ्या मित्राला धडा शिकवायचा, असं रागावलेल्या मित्राने ठरवलं. आज तो भावासह शाळेबाहेरील तिघांना घेऊन आला होता. तू माझ्या भावाला का चिडवतो, धारदार शस्त्र दाखवून भावासह मित्राने चिडवणाऱ्याला जाब विचारला. हे पाहून शाळेतील एक मित्र मध्यस्थी करायला पुढं आला, अशातच चिडवणारा मित्र बाजूला राहिला अन् मध्ये पडलेल्या मित्रावरचं शस्त्राने वार करण्यात आले आहेत.

मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. डोक्यात टाके ही पडले आहेत. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.






















Join Our Whatsapp Group