पिंपळे सौदागर (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे रविवार दि.२० रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर घेण्यात येत असून पिंपळे सौदागर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांच्या पुढाकारातून रविवार दि.२० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर येथे हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास नाना काटे सोशल फाउंडेशन तर्फे एक व्हॅक्यूम फ्लास्क सेट भेट वस्तू दिले जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनींना व रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य रक्तदान शिबिर –
वेळ : रविवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
स्थळ : महादेव मंदिर, पिंपळे सौदागर
टीप: प्रत्येक रक्तदात्यास नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे एक व्हॅक्यूम फ्लास्क सेट भेट वस्तू दिली जाईल.
