पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील शेवाळे सेंटर जवळ व्हिसडम पार्क सोसायटीच्या समोरील रस्त्यावर एका तरुणाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.२०) रात्री नऊ वाजता करण्यात आली.

पोलीस कॉन्स्टेबल रोहीत वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार उर्फ़ आण्णा बाळु हजारे (२३, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील शेवाळे सेंटर जवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार हजारे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार ५०० रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी ओंकार याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group