पिंपरी (Pclive7.com):- निगडीत अंकुश चौक येथील मोकळ्या जागेत एका अनोळखी वाहनावरील चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका व्यक्तीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२०) सकाळी साडेदहा वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली.

संदीप देविदास नाटेकर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात बसुराज साहेबराव नाटेकर (४१, मिलींदनगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे, हयगईने, निष्काळजीपणे चालवून फिर्यादी नाटेकर यांचा चुलत भाऊ संदीप नाटेकर यांना धडक दिली. टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने संदीप नाटेकर यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत.























Join Our Whatsapp Group