पिंपरी (Pclive7.com):- घरकुल चिखली परिसरात गेल्या १५ ते १६ तासांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. तरी तातडीने उपाययोजना करून येथील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या नेतृत्वात महावितरण विभागाचे अभियंता जाधव साहेब यांना भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात मारुती जाधव यांनी म्हटले आहे की, घरकुल चिखली परीसर भागात गेल्या १५ ते १६ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत विभाग व कर्मचारी यांच्याकडून नागरीकांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसून घरकुलमधील सर्व सामान्य नागरीकांचा वीज नसल्पायामुळे पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला आहे. तसेच नागरिकांना अर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.

घरकुल परिसरातील महात्मा फुले नगर, शरदनगर, पूर्णा नगर, कृष्णानगर, अजंठा नगर कोयना नगर, सुदर्शन नगर भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून तातडीने यावर उपाययोजनात न केल्यास आकुर्डी थरमॅक्स चौक येथील महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा मारुती जाधव यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group