पिंपरी (Pclive7.com):- गाडी बाजूला घेतल्याच्या वादातून वेटरवर लोखंडी हँडलने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काळेवाडी येथील प्यासा बारमध्ये घडली.

ज्ञानेश्वर उर्फ मामा शिवदास माकणे (वय ४०, रा. फ्लॅट नं. १०३, साई दर्शन सोसायटी, ताथवडे) व पंडित अशोक अंदगुले (वय ३६, रा. शिवतीर्थनगर, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुखाचार्य दारबा हळनर (वय १९, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. ८) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हळनर हे प्यासा बारमध्ये वेटर म्हणून काम करत आहेत. कोल्ड ड्रिंकची गाडी बारसमोर आल्याने फिर्यादी दुचाकी गाडी बाजूला करत होते. त्यावेळी आरोपींनी त्याला कोणाला विचारून गाडीला हात लावला, असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपी पंडीर याने शटरच्या लोखंडी हँडलने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.























Join Our Whatsapp Group