पिंपरी (Pclive7.com):- धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांनी मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.८) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिंचवड येथील काळभोरगनरमधील महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.

मोहित अनंत लांडगे (वय २२, रा.रावेत) आणि शिवम वाळुंज (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक दीपक साठे (वय २२, रा. शिवराईनगर, बिबवेवाडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक महाविद्यालयामधील स्वच्छतागृहात गेले असता त्यांचा धक्का संशयित मोहित लांडगे याला लागला. त्यामुळे मोहित याने शिवीगाळ करून फिर्यादी अभिषेक यांना हाताने मारहाण केली. तर संशयित शिवम वाळुंज याने लोखंडी कोयत्याने फिर्यादी अभिषेक यांच्या डोक्यावर हल्ला केला. पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.























Join Our Whatsapp Group