

पिंपरी (Pclive7.com):- पर्यावरण पुरक सृष्टीचा ध्यास घेतलेल्या ग्रीन आईज ऑर्गनायझेशन संस्थेच्या ध्येयाची पाच वर्ष यशस्वी वाटचाल पुर्ण झाल्या बद्दल तसेच शहरातील पर्यावरण प्रमींच्या कार्याचा गौरव व त्यांच्या विषयी संस्थेची असलेली जबाबदारी या विचारातून व अभिनेत्री आर्या घारे यांच्या पुढाकाराने ग्रीन आईज ऑर्गनायझेशन परिवराच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शहरातील विविध सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या व्यक्तिंना व संस्थाना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सुरुवात शुन्यातून..
अभिनेत्री आर्या घारे यांच्या ‘सुरुवात शून्यातून’ या पुस्तकाचे प्रकाशन सयाजी शिंदे, इरफान सय्यद, इंडियन आयडॉल फेम चैतन्य देवडे, माजी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, राजू हिरवे झुंज दिव्यांग संस्था आश्रम, प्रशांत भालेकर गो ग्रीन वृक्षसंवर्धन लक्ष्मण सुतार अविरत श्रमदान, विजय जगताप सहारा वृद्धाश्रम, तसेच संदीप राक्षे आणि पराग कुंकुळोळ यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आले.

यांची होती उपस्थिती..
या कार्यक्रमाला प्रसिध्दी मराठी व साऊथ अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेनेचे उपनेते व वरीष्ठ कामगार नेते इरफान सय्यद, माजी महापौर नितीन काळजे, लेखक संजय सोनवणी, सिने अभिनेता अक्षय वाघमारे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश समन्वयक नितीन शिंदे, इंडियन आइडल चैतन्य देवढे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष बापू जगदाळे, शिवसेनेचे संदीप जाधव, सचिन तापकीर, घारजाई माताजेष्ठ नागरीक संघाचे, सिध्दनाथ जोशी, गौरव वाळुंजकर, झुंज दिव्यांग संस्थेचे राजीव हिरवे, विलास कातोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group