
पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे – किल्ले कोरीगड येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. यावेळी किल्ले परिसरात असणारे प्लास्टिक बॅग, प्लास्टिक बॉटल, बुरुज परिसर असणारे प्लास्टिक साफ करण्यात आले.

यावेळेस शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव, शिवशाही प्रतिष्ठान सचिव तेजस महेंद्र राऊत, शिवशाही प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अथर्व सुनिल तावरे आणि या कार्यामध्ये सिद्धार्थ तावरे, ऋषी शिरसाट, अनिरुद्ध जगदाळे, साहिल दळवी हे उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत बोलताना शिवशाही प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अथर्व सुनिल तावरे म्हणाले की, “किल्ले कोरीगड हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपतींच्या पवित्र भूमीत स्वच्छतेचं शिवधनुष्य उचलणं हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या किल्ल्याची स्वच्छता आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारीच नाही तर आपला अभिमान आहे. शिवशाही प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे तरुणांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि शिवकालीन वारसाबद्दल आदर निर्माण झाला आहे. आम्ही सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली आणि पुढेही अशाच उपक्रमांद्वारे किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा संकल्प आहे.”

शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव म्हणाले : “छत्रपती शिवरायांनी उभारलेले प्रत्येक किल्ले हे स्वराज्याच्या पराक्रमाचे प्रतीक आहेत.त्या किल्ल्यांची स्वच्छता करणे म्हणजे इतिहासाला वंदन करणे. शिवशाही प्रतिष्ठानचं हे कार्य फक्त स्वच्छतेपुरतं नाही, तर आपल्या संस्कृती आणि अभिमानाचं रक्षण आहे. असेच उपक्रम सातत्याने राबवत आपण महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला उजळून ठेवू – हाच आमचा शिवसंकल्प आहे.”






















Join Our Whatsapp Group