पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, ताथवडे, वाकड मधील महिलांसाठी “उत्सव आनंदाचा – खेळ पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे राहुल काटे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार शंकर जगताप यांचे समर्थक राहुल काटे यांनी महिलांसाठी खास स्पर्धा आयोजित केली होती. दि.०८ नोव्हेंबर रोजी काटे चौक, काटे वस्ती, पुनावळे येथे “क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य (रेणुका)
(फेम – लक्ष्मी सिरियल) या होत्या. यावेळी स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये टिव्ही, फ्रिज, गॅस शेगडी, मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी आदी बक्षीसांचा समावेश होता. या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या शुभहस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान, व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

यावेळी सुनील ढवळे (कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते), काळूराम बारणे (भाजपा पिं.चिं.शहर वरिष्ठ उपाध्यक्ष), राम वाकडकर (भाजपा शहर उपाध्यक्ष), प्रसाद कस्पटे (मंडल उपाध्यक्ष भाजपा), कुणाल वाव्हळकर (RPI शहराध्यक्ष), चेतन पवार (युवा नेते), विजय दगडे, ज्ञानदेव काटे (विश्वस्त,श्रीराम मंदिर पुनावळे), विजय दर्शले, शुभम भुजबळ, नितीन दर्शले, अमित दर्शले, किशोर चित्राव, अशोक कट्यारे (भाजपा) तसेच प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, ताथवडे, वाकड मधील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सोसायटीचे चेअरमन, सदस्य व परिसरातील बहुसंख्य नागरिक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group