
पिंपरी (Pclive7.com):- निगडी भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू असून, या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जाधववाडी चिखलीकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित (शिफ्ट) करावी लागणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हे काम मंगळवार दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.

जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामासाठी, सदर जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या चिखली येथील जाधववाडी परिसर, मोईफाटा ते रिव्हर चौक आणि किनारा सोसायटी परिसर इत्यादी भागातील ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार (१२ नोव्हेंबर २०२५) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.

नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group