आमदार महेश लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आदर्श उपक्रम; शहरातील सुमारे पाच हजार महिला कष्टकरी-घर कामगारांची नोंदणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या, घराघरांत स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाशी सतत दोन हात करणाऱ्या घरकामगार व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात येतणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शहरात १०० हून अधिक उपक्रम आयोजित केले आहेत. यावर्षीचा वाढदिवस सफाई-घर कामगार माता-भगिनींना समर्पित करण्याचा संकल्प केला असून, सुमारे ५ हजार माता-भगिनींचा सन्मान होणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक अमोल बांगर यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल 100 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सांस्कृतिक, आरोग्य विषयक आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. आमदार लांडगे यांच्या ‘‘आयुष्याचा सुवर्णमहोत्सव आणि समाजसेवेचा रौप्य महोत्सव’’ असा योग जुळून आला असून, विधायक उपक्रमांनी हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दि. 23 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान, प्रत्येक कार्यक्रमस्थळी सफाई व घर कामगार माता-भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

समन्वयक अमोल बांगर म्हणाले की, दिवसभर उन्हात कष्ट करणाऱ्या, मजुरीवर संसार चालवणाऱ्या, मुलांच्या भवितव्याची चिंता मनात बाळगूनही रोज नवी उमेद घेऊन उठणाऱ्या या स्त्रियांचा संघर्ष पिंपरी–चिंचवडच्या कामगार वस्त्यांत सर्वत्र दिसून येतो. लहानपणापासून मजुरीच्या चक्रात गुरफटलेल्या, तारुण्य संकटात हरवून बसलेल्या आणि परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहणाऱ्या या महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक सन्मानाचे वलय पहिल्यांदाच मिळत आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम..
महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेले आमदार महेश लांडगे यांनी राज्यातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा आयोजित करून हजारो महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दिला. या जत्रेत सुमारे १ हजार बचतगटांना व्यावसायिक प्रोत्साहन, बाजारपेठ, विक्रीची संधी आणि आर्थिक बळ मिळते. माता-भगिनींच्या रक्षणासाठी कायम आग्रही राहिलेल्या आमदार लांडगे यांच्या या कार्याचा आदर्श घेऊनच घरकामगार व सफाई कामगार महिलांचा सन्मान उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आरोग्य, शिक्षण आणि लाभ योजनांकडे महिला केंद्रबिंदू
या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक समानतेचे हक्क, मोफत रक्तदान योजनेचा लाभ, वैद्यकीय सुविधा आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरातील अनेक महिलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत सुमारे 4 हजार 700 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व अर्जदार महिलांना विशेष भेटवस्तू, मानपत्र आणि शासकीय योजनांचे माहितीपत्रक देण्यात येणार आहे. दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदानात आमदार लांडगे यांचा वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा होईल. यावेळी घरकामगार- कष्टकरी माता-भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबरपर्यंत महिलांना नोंदणी करता येईल. यासाठी https://forms.gle/ TpvSJanJrLK27BrC6 या लिंकवर फॉर्म भरता येईल. तसेच, अमोल बांगर- 7709 700 999 यांना संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक समानतेचे हक्क, मोफत रक्तदान योजनेचा लाभ, वैद्यकीय सुविधा आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरातील अनेक महिलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत सुमारे 4 हजार 700 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व अर्जदार महिलांना विशेष भेटवस्तू, मानपत्र आणि शासकीय योजनांचे माहितीपत्रक देण्यात येणार आहे. दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदानात आमदार लांडगे यांचा वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा होईल. यावेळी घरकामगार- कष्टकरी माता-भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबरपर्यंत महिलांना नोंदणी करता येईल. यासाठी https://forms.gle/
“महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यासाठी कायम आग्रही असलेले आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम-उपक्रम होत आहेत. घरकामगार आणि कष्टकरी माता-भगिनींना केवळ सन्मान देणे हा उद्देश नाही; त्यांच्या गरजांपर्यंत शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. मोफत रक्तदान योजना, वैद्यकीय सुविधा आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन यासाठी आम्ही विहित नमुन्यात अर्ज स्विकारत आहोत. संघर्षाशी झुंज देणाऱ्या प्रत्येक महिलेला ही मदत पोहोचावी, हीच आमची भूमिका आहे.”
– अमोल बांगर, समन्वयक.






















Join Our Whatsapp Group