
पुणे (Pclive7.com):- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती, त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. इतर मजकूर ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.






















Join Our Whatsapp Group