
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगाव येथे हेमंत महादेव डांगे व सागर मधुकर चिंचवडे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त आयोजित बालजत्रा, मनोरंजन नगरीला परिसरातील चिमुकल्यांसह पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केली होती, या स्पर्धेत ९०० मुलांनी भाग घेतला. तसेच हजारो मुलांनी बालजत्रेचा आनंद लुटला, याप्रसंगी बालचमुंनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला.

चिंचवडगावातील श्रीमान महासाधु मोरया गोसावी क्रीडासंकुल येथे दि.१४ ते दि.१६ नोव्हेंबर या कालावधीत बालजत्रा पार पडली. यावेळी राहुलदादा कलाटे, नाना सोनार, मधुकर बच्चे, अनिकेत प्रभु, विठ्ठल भोईर, प्रशांत बाबेल, तुषार वराडे, निखिल गावडे, नासिर शेख, नागेश सदावर्ते, मयुर हरसुले, ओंकार पाटोळे, अमित कणभरकर, अनिकेत पाटील, सागर लाडवंजारी, प्रज्योत पुजारी, किरण पाटील, शरण्य पाटणे, आशुतोष देवकर, अभिषेक, यश कुदळे, संदेश सोनवणे, राहुल मुसळे, विशाल साळुंके, अक्षय नाळे, महेश बडगुजर, विजय भोईर आदी मान्यवरांसह परिसरातील लहान मुले व नागरिक हे मोठ्या संखेने उपस्थित होते.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मुलांना आनंद लुटण्यासाठी बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी झुकझुक गाडी, पाण्याची बोट, जादूचे प्रयोग, पाळणे, मिकी माउस, छोटा मोठा पाळणा, सेल्फी पॉइट या खेळण्यातील वस्तूचा आनंद घेतला. चिंचवड परिसरातील पालक, बालकांनी मोठ्या संख्येने जत्रेत सहभाग घेतला. मुलांनी भरभरून जत्रेचा आनंद घेतला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह खरंच ऊर्जा देणारा होता. या दिवशी हजारो मुलांनी या बालजत्रेचा आनंद घेतला.























Join Our Whatsapp Group