पिंपरी (Pclive7.com):- शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरावर पुणे पोलिसांनी छापा टाकून महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या शोधासाठी झाडाझडती केली आहे. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या शीतलकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्तऐवज तसेच ३०० कोटींच्या व्यवहारातील काही रक्कम येथे दडवून ठेवली असण्याची शक्यता तपासात समोर आली आहे. वैष्णोदेवी मंदिराजवळ असलेल्या माहेरातील घरात पुरावे लपवले असावेत, अशी पोलीसांची शंका आहे.

शीतल आणि तिचे पती सागर सूर्यवंशी हे सध्या पुण्यात राहत असले तरी पोलिसांच्या मते महत्त्वाचे पुरावे माहेरी साठवले गेले असावेत. मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी असून पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी वादग्रस्त पद्धतीने जमीन खरेदी करण्यात आली होती.

तपासातील अनियमितता उघड झाल्यानंतर तिची दोन वेळा चौकशी झाली होती आणि अखेर अटक करण्यात आली. एफआयआर रद्द करण्यासाठी शीतलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाकडून तात्काळ दिलासा मिळाला नाही. या प्रकरणातील गुन्हे बावधन पोलीस ठाण्यासह पुणे पोलिसांकडे नोंदवले गेले असून एकूण नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

























Join Our Whatsapp Group