
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांनी मिठाईच्या दुकानाची कोयत्याने तोडफोड केली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काळेवाडीत घडली. अवघ्या दहा सेकंदात चार अल्पवयीन मुलांनी घातलेला हा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. मात्र ज्याच्या सांगण्यावरून ही तोडफोड करण्यात आली त्या मुलाचा शोध सुरु आहे. त्यामुळं या तोडफोडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हातात कोयते नाचवत अल्पवयीन मुलांनी घातलेला धुमाकूळ पाहून परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे.

























Join Our Whatsapp Group