पिंपरी (Pclive7.com):- २००६ सालापासून माजी नगरसेवक कै. एकनाथदादा थोरात यांचे विश्वासू सहकारी म्हणून अहोरात्र सारथीची जबाबदारी निस्वार्थीपणे पार पाडणारे मारुती जाधव आता प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपच्या तिकिटावर अनुसूचित जाती प्रवर्गातून नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.

प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर, कृष्णा नगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर मधील सामान्य कुटुंबातील हा कार्यकर्ता म्हणजे मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण. आई धुनी भांडी करून संसाराचा गाडा हाकत असताना वडील टाटा मोटर्समध्ये माथाडी मध्ये मजूर.. म्हणून कामं करत अशा कठीण परिस्थितीतही मुलांना शिक्षण देत घडवलेला मारुती जाधव म्हणजे सामान्य मातीतील उठलेला हिराच म्हणावा लागेल.

आमदारकीची निवडणूक आली की घराघरात ‘दादा मंडळी आली!’ असे ज्या व्यक्तीमुळे जाणवायचे, तो चेहरा म्हणजे मारुती. 2014, 2019 आणि 2024—तिन्ही विधानसभा निवडणुकांत आमदार महेशदादा लांडगे यांच्या विजयामागे ज्या काही मोजक्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यात मारुती जाधव अग्रस्थानी आहे. महेशदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा सच्चा सैनिक जनतेत प्रचंड लोकप्रिय आहे.

केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मारुतीची ओळख आदर्शवत आहे. रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे, गरजूंना मदत करणे, रक्तदाते उभे करणे, संकटात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे—हजारो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या ‘जनतेच्या सारथ्या’चे काम संपूर्ण प्रभाग ओळखतो तसेच पत्नी सौ. कीर्ती मारुती जाधव यांच्या खंबीर साथीने प्रभागातील घोडदौड जोरात सुरु आहे, त्यात सोबतीला असणारे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ धनंजय जाधव व संतोष जाधव.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये जोरदार चर्चा..
“आमदार महेशदादा लांडगे आपल्या या सारथ्याला नगरसेवकपदाची संधी देणार का?” या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधीच प्रभागात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांमध्ये असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे की, “यावेळची निवडणूक मारुतीचीच!” जनतेचा सारथी, सर्वसामान्यांचा नेता, आणि समाजकार्यात रात्रंदिवस राबणारा कार्यकर्ता मारुती जाधव नगरसेवकपदाच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याने प्रभाग ११ मध्ये उत्साह उफाळून आला आहे.
























Join Our Whatsapp Group