भोसरी (Pclive7.com):- भोसरी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. अजय लक्ष्मण नखात (वय २३ वर्षे, रा. लक्ष्मी मंदिर, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे.) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मारोती व्यंकटी जायभाय यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०४ रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भोसरीतील देवकर वस्ती येथील मोकळ्या मैदानात आरोपी फिरताना पोलिसांना दिसला. संशयित हालचालींमुळे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अवैध पिस्तूल व जिवंत काडतूस आढळले.

आरोपींकडून २५ हजार रूपये किंमतीचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक खाडे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group