
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे असा आरोप महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी केला आहे. यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. आता याच मतदार याद्यांवर १० हजार २८८ हरकती नोंदल्या गेल्या आहेत.

यात नाव वगळणे, पत्ता दुरुस्ती, दुबार नाव आदी तक्रारींचा समावेश आहे. पिंपरी पिंपरी महापालिकेने 32 प्रभागासाठी केलेल्या प्रारूप मतदार याद्या यात अ – 818, ब -1306, क -2461, ड -1480, ई -430, फ -1668, ग -1345, ह -780 हरकती व सूचना आल्या आहेत. आता प्रत्यक्षात अंतिम याद्या जाहीर होतील, तेंव्हा या हरकतींना निवडणूक आयोगाने किती गांभीर्यानं घेतल आहे, हे स्पष्ट होईल.























Join Our Whatsapp Group