पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी, टेल्को कपूर सोसायटी, विठ्ठलवाडी, श्रीकृष्ण क्रांतीनगर, विवेकनगर परिसरात काढलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला गती दिली आहे. दत्तवाडी, टेल्को कपूर सोसायटी, विठ्ठलवाडी, श्रीकृष्ण क्रांतीनगर, विवेकनगर परिसरात रॅली काढण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. प्रचार फेरीत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. उमेदवारांनी नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला. गाठीभेटी घेतल्या. नागरिकांचा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनेलचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

आमच्याकडे प्रभागाच्या विकासाचे व्हिजन आहे. व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करतो. मागील पंचवार्षिकमध्ये पॅनेलमधील दोघे नगरसेवक होते. त्यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. प्रभागाला आदर्श करण्यासाठी जनतेचा नक्कीच आशिर्वाद मिळेल. आकुर्डी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. जनता पाठिशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला आहे.























Join Our Whatsapp Group