पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला असून भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष श्री अनिकेत सुरेश बाबर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

याचवेळी श्री अनिकेत सुरेश बाबर यांच्या पत्नी सौ. प्रणिती अनिकेत बाबर यांना शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक ११ – सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

हा पक्षप्रवेश शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिकेत बाबर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे गटाला युवकांची मजबूत ताकद मिळणार असून प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातील निवडणुकीची गणिते पूर्णतः बदलतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सद्यस्थितीत सौ. प्रणिती अनिकेत बाबर यांचा विजय निश्चित होईल, अशी वातावरणनिर्मिती झाल्याचे दिसून येत आहे.
या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असून भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group