पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. जंगीड समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना बोलावून घेत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले असून विजय निश्चित असल्याचा विश्वास या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे हे चारही उमेदवार अनुभवी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. या उमेदवारांचा अनुभव, कामाच्या पद्धतीमुळे जंगीड समाजाने त्यांना मोहननगर येथील जंगीड समाजाच्या विश्वकर्मा मंदिरात बोलावले. जंगीड समाजातील नागरिकांनी चारही उमेदवारांचे पुष्पहार अर्पण करुन, पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उत्साहात स्वागत केले. चारही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आहे. त्यांना प्रभागातील समस्यांची जाण आहे. जनतेत मिसळतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात. सुख, दुख:त सहभागी होतात. त्यामुळे नागरिकांचा पाठिंबा वाढत असून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले जात आहे. प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला.























Join Our Whatsapp Group