पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात कुणाल हॉटेलसमोर असलेल्या फटाक्याच्या दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. तापकीर चौक परिसरात रुग्णालयाच्या खालीच हे दुकान असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.

आगीमुळे परिसरात प्रचंड धूर पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तब्बल १० बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस व महापालिका प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले आहे.

आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group