पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. दत्तवाडीमधील रुपेश कॉलनीमधील प्रचार फेरीला नागरिकांना तुफान प्रतिसाद मिळाला. प्रभागात पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वादळ घोंगावत आहे.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचाराची एक फेरीही पूर्ण झाली आहे. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, रांगोळाच्या पायघड्या घालून उमेदवारांचे स्वागत केले जात आहे. दत्तवाडीमधील रुपेश कॉलनीतील प्रचार फेरीत महिला, पुरुष, वृद्धांसह सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता चारही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रभाग १४ मध्ये घड्याळाचा गजर होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

मागील पंचवार्षिकमध्ये प्रभागाचा सर्वांगीण आणि समतोल विकास केला. प्रभागातील उर्वरित कामे पूर्ण करायची आहेत. प्रभागाला आदर्श मॉडेल करायचे आहे. त्यासाठी आम्ही चारही उमेदवार कटिब्ध आहोत. पॅनेलमधील दोघांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. दोघे जण अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात सक्रिय आहेत. आमच्याकडे प्रभागाच्या विकासाचे व्हिजन आहे. व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रभागातील जनता नक्कीच महापालिका सभागृहात मोठ्या मताधिक्याने पाठवेल, असा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला.

























Join Our Whatsapp Group