
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून, थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेना- राष्ट्रवादीच्या युतीचे उमेदवार विश्वजीत बारणे, निलेश बारणे, मायाताई बारणे आणि रूपालीताई गुजर यांनी प्रचाराचा धुराळा उडवत मोठी आघाडी घेतली आहे. ‘होम टू होम’ प्रचारानंतर प्रभागातील सर्व कॉलनी आणि सोसायटीधरकांच्या गाठीभेटी घेत संपूर्ण पॅनलने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये युतीच्या उमेदवारांचा प्रचार लाटेसारखा पुढे जाताना दिसत आहे. प्रभागातील गणेश कॉलनी दुर्गा कॉलनी, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी, स्वप्न पुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क लेन वन, लेन टू, लेन थ्री, साई पार्क आदी परिसरात घराघरांत पोहोचून थेट संवाद, प्रचार, विकासकामांचा ठोस लेखाजोखा आणि आगामी काळातील स्पष्ट दृष्टीकोन यामुळे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावरून, गल्ल्यांमधून आणि चौकाचौकांतून “विजयाची नांदी” स्पष्टपणे ऐकू येत आहे.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार (क गट) सौ. बारणे मायाताई संतोष (निवडणूक चिन्ह – घड्याळ)यांनी आपल्या कार्यशैलीने आणि जनसंपर्कातून महिला, युवक व ज्येष्ठांचा विश्वास मिळवला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार (अ गट) श्री. बारणे विश्वजीत श्रीरंग (धनुष्यबाण) आणि (ड गट) श्री. बारणे निलेश हिरामण (धनुष्यबाण) यांनी संघटनात्मक ताकद दाखवत प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवार (ब गट) सौ. गुजर रूपालीताई लालासाहेब (ऑटो रिक्षा) यांनाही नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे.
युतीच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, प्रत्येक प्रचार फेरीत जोश, शिस्त आणि आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो आहे. “विकास, स्थैर्य आणि लोकहित” या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी- शिवसेना युतीचा आक्रमक प्रचार भाजपसाठी मोठे आव्हान ठरत असून, विशेषतः प्रभाग क्रमांक २४ मध्ये विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.






















Join Our Whatsapp Group