पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील अपक्ष उमेदवार ॲड. प्रतीक्षा रमेश वाघेरे (काळे) यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युग होंडा सर्व्हिस सेंटर, काळेवाडी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर विजय नगर, ज्योतिबा मंदिर परिसर, भारतमाता चौक, नढे नगर, प्रेमलोक कॉलनी, काळेवाडी गावठाण, पवना नगर, आदर्श नगर आदी संपूर्ण प्रभागात पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा प्रतीक्षा वाघेरे (काळे) यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ येऊन संपन्न झाली.

या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांचा या पदयात्रेत लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना ॲड. प्रतीक्षा वाघेरे (काळे) यांनी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासाचा आपलं व्हिजन मतदारांसमोर मांडलं. “प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याच्या समस्या, ड्रेनेज व्यवस्था सुधारणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे ही माझी प्रमुख उद्दिष्टे आहेत,” असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधून अ गटातून त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांचे निवडणूक चिन्ह ‘नारळ’ आहे. नारळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
महिलांचा वाढता पाठिंबा पाहता, आगामी निवडणुकीत प्रतीक्षा वाघेरे (काळे) मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group