पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या गॅस एजन्सी आणि अनधिकृत गॅस रिफिलींगच्या नावाखाली राजरोसपणे चोरी करणारी टोळीची सक्रीय झाली आहे. या सुरू असलेल्या गैरकारभारावर छावा संघटना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार असल्याचे निवेदनाव्दारे कळविले आहे. यासंदर्भात छावाने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच अन्नधान्य वितरण विभागाला देखील भेटुन कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना छावा संघटना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल आण्णासाहेब वीर यांनी निवेदन दिले. यावेळी छावा संघटना सल्लागार मच्छिंद्रभाऊ चिंचोळे, समीर वीर, प्रविण भोसले, अक्षय ठिंगळे, दादा सुतार, किरण रजपुत,अमित भोसले, आकाश लांडगे, युवराज बाबर, यांनी निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक गॅस एजन्सी कार्यरत आहेत. तसेच गॅस रिफिलींगच्या नावाखाली काळा धंदा करणारी टोळी कार्यरत आहे. यात जास्त करून परप्रांतीय कारागिरांकडून गॅसची चोरी केली जाते. तर ग्राहकांकडून गॅसच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जाते. याबाबतचे सर्व पुरावे असून याप्रकरणात लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. पुढील काळात छावा स्वतः वजनकाटा घेऊन ग्राहकांच्या हक्कासाठी मैदानात उतरणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातून या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे.
तरी नागरीकांना गॅस चोरी विरोधात माहिती मिळाल्यास आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन व छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन छावाच्या वतीने करण्यात आले आहे.