पिंपरी (Pclive7.com):- अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांचे आदर्श महानायक, राजे मल्हाररावजी होळकर यांच्या बाबतीत सोशल मिडीयावर “वाल्याचा वालमीकी व मल्याचा मल्हारराव होळकर” अशी टिपण्णी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
४८ तासाच्या आत जितेंद्र आव्हाड यांनी अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांची जाहीर माफी मागावी अशी मागणी गोंदियाचे शिवसेना तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले आणि शिवशाही व्यापारी संघांचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने जाब त्यांना विचारला जाणार असून याकामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील युवराज दाखले यांनी दिला आहे.