पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव येथे एका ३ ते ४ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा घातपात असण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाजवळ एका ३ ते ४ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आज (शुक्रवार) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास आढळून आला. नागरिकांनी याची कल्पना वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्या हात एखाद्या प्राण्याने खाल्ले आहेत. या मुलाची ओळख अद्याप पडटली नसून पोलीस ओळख पटवण्याचे काम करीत आहेत.
मृत मुलाच्या अंगावर फक्त चड्डी असून ती चड्डी प्रेरणा स्कूलची असण्याची शक्याता वर्तवण्यात आली आाहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता घटनास्थळावर वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group