पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मंजुर करण्यात आलेला रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा आणि येथे सुरु असणारे भीमसृष्टीचे काम व प्रवेशव्दाराचे काम तातडीने पुर्ण करावे अन्यथा पिंपरी चिंचवड शहर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धुराजी शिंदे यांनी दिला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 13 डिसेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनात लोक जनशक्ती पार्टीचे दलित सेना प्रदेशाध्यक्ष सुनिल यादव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक गिरने, प्रदेश सचिव दिपाली लोंढे, पुणे जिल्हा क्रीडा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष दिनकर ओव्हाळ, रयत विद्यार्थी मंच संस्थापक अध्यक्ष धम्मराज कांबळे, पिंपरी चिंचवड शहर क्रीडा अध्यक्ष अंकुश कांबळे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष नसिम शेख, चिंचवड विधानसभा सचिव अनिल मकरे, युवा नेता आलोक गिरने, बंजारा प्रकोष्ट राजकुमार चव्हाण, कांचन जावळे, राहुल प्रधान, हरिभाऊ गायकवाड, गिरीष सोनवणे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष विनोद भालेराव, हिराभाऊ लांडगे, आकाश शिंदे, शरद कांबळे, संदीप गायकवाड, अशोक भोळे, कांचन जावळे आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group