सभा पटलावरील विषय मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो, तर एखाद्या प्रस्तावातील त्रुटी काढून तो विषय चुकीचा कसा आहे, हे सांगत या प्रस्तावाला विरोधक विरोध करतात, असे चित्र प्रत्येक सभागृहात पहायला मिळते. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीने प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवा वर्गीकरण प्रस्ताव विनाचर्चा मान्य केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या बदल्यांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचा आरोप करत, आक्रमक भुमिका घेत, या विषयावर थेट महापौर व्यासपीठाकडे धाव घेत ठिय्या मांडला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याची ही तहकूब सभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर देखील सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या तहकूब सभेत याच विषयावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सभागृहातील कुंडी फेकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महापालिकेची डिसेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा सुरू असताना, महापालिकेच्या निरुपयोगी भंगार वस्तु विक्रीचा प्रस्ताव उपसूचना वगळून थेट प्रस्ताव मंजुर करण्याची उपसूचना मंजूर करत असल्याचे महापौर जाधव यांनी जाहीर केले. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला. तोपर्यंत महापौर जाधव यांनी जाहिरात धोरण ठरविण्यासारखा पुढील संवेदनशील विषय सभागृहात मांडला व मंजुरी देखील देऊन टाकली. त्यावर पुन्हा दत्ता साने यांनी हरकत घेतली. महापौर जाधव विरोधकांना आपले मत मांडू देत नसून, सभागृहातील सदस्यांच्या एकेरी उल्लेखाला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. सर्व सदस्यांचा मान ठेवावा. ऊठ, बस असे बोलू नये. अति करू नये. मी मारल्यासारखे करतो, तु रडल्यासरखे कर, असे तुम्हा दोघांचे चालले आहे असे सुनावत चिखलीकर, तुम्ही सभागृह गुंडाळाताय का ? असा शब्दप्रयोग दोन्ही नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याशिवाय कलाटे यांच्या विधानाला भाजपच्याच नगरसेवकाने पुष्टी दिल्याने, महापौरांना आपला मोर्चा पुढील विषयाकडे वळविणे भाग पडल्याचे चित्र सभागृहात पहायला मिळाले.
महापौर-विरोधी पक्षनेत्यांची छुपी युती?
























Join Our Whatsapp Group