पिंपरी (Pclive7.com):- महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत खास महिलांसाठी नोकरी महोत्सव भरविण्यात असून आज शनिवारी १२३० मुलाखती झाल्या. हा महोत्सव शनिवार (दि.९) आणि रविवार (दि.१०) रोजी भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदान येथे असून केवळ महिलांसाठी असलेल्या या मेळाव्यात १२३० मुलाखती झाल्या. त्यापैकी ३५४ जणींना ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.
या मेळाव्यात बीपीओ, एनजीओ, रियल इस्टेट, रिटेल, ऑटोमोबाईल, हेल्थकेअर, शिक्षण, बँकिंग, व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, केपीओ, सुरक्षा, फायनान्स, विमा, हॉस्पिटल यांसारख्या विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभाग घेतला असून हजारो महिला भगिनींना यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इंद्रायणी थडी निमित्त भोसरी विधानसभा मतदार संघातील महिलांना आपले कर्तृत्व दाखविण्याची अनोखी संधी मिळाली आहे. जॉब फेअरच्या माध्यमातून त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाचवी ते पदवीधर, एमबीए, डिप्लोमा, आयटीआय, तसेच पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवार या मेळाव्यात सहभागी झाल्या असून मुलाखतीमध्ये पात्र होणाऱ्या महिला उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले. पूर्व नोंदणी केलेल्या सुमारे ४५०० महिलांपैकी आज १२३० मुलाखती झाल्या आणि ३५४ जणी पात्र ठरल्या आहे.























Join Our Whatsapp Group