पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरण ९२.२७ टक्के भरले होते. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात वाढ होत असून धरणातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वडगावचे तहसिलदार यांना याबाबत कळविले असल्याची माहिती पवना धरणाच्या शाखा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.