पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे. मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे उद्या समजून येईल पण तोपर्यंत या फलकाबाबत भोसरीत चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे. भोसरीतून भाजपचे महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात लढत झाली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महेश लांडगे यांचे आमदार झाल्याचे फलक आजच झळकले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अति आत्मविश्वासाची चर्चा सुरु झाली आहे.चिखली, चऱ्होली, मोशी परिसरात आमदार महेश लांडगे यांना शुभेच्छा देणारा फलक झळकला आहे. ‘महेशदादा लांडगे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’, ‘पर्मनंट आमदार’ असा मजकूर या फलकावर आहे. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे उद्या स्पष्ट होणार आहे. मात्र तुर्तास तरी महेश लांडगेंच्या विजयाचा फलक शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
























Join Our Whatsapp Group