पिंपरी (Pclive7.com):- दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून ‘पीक अप टेम्पो’ चोरणाऱ्या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ‘पीकअप टेम्पो’ जप्त केला आहे. कालिदास प्रकाश केदारी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भूमकर चौक वाकड येथे गुंडा स्कॉड कारवाई करीत होते. त्यावेळी एक पीकअप भूमकर चौकाकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी पीकअपला अडवून तपासणी केली असता ती पीकअप गाडी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पीकअप चोरल्याची कबुली दिली. कालिदास याला दारूचे व्यसन आहे. त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हिंजवडी परिसरातून पीकअप टेम्पो चोरल्याचे सांगितले. कालिदास हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हि कामगिरी वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे सहायक निरीक्षक अनिरुद्ध गिजे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
























Join Our Whatsapp Group