पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल १७ नगरसेवक इच्छुक आहेत. या महिन्यात राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. उद्या (दि.२०) रोजी होणाऱ्या महापालिका सभेत नव्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात महापौर, स्थायी सभापती, सत्तारूढ पक्षनेतेपद भूषविलेल्या नगरसेविकांनी देखील स्थायीच्या सदस्यपदासाठी अर्ज केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीत सभापतींसह १६ सदस्य असतात. पिंपरी महापालिकेत भाजपाची सत्ता असल्यामुळे सभापतीपद हे भाजपाकडे आहे. या समितीत एका अपक्षासह भाजपाचे ११ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षीय बलाबलानुसार ४ सदस्य असून शिवसेनेचा १ सदस्य या कमिटीत आहे. फेब्रुवारी महिना अखेरीस राष्ट्रवादीच्या चार पैकी गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर या २ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्या रिक्त जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी राष्ट्रवादीने इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले होते. शनिवार दि.१५ अखेर राष्ट्रवादीच्या ३८ नगरसेवकांपैकी १७ नगरसेवकांनी अर्ज विरोधी पक्षनेत्यांकडे दिले आहेत. राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात वैशाली घोडेकर, अपर्णा डोके यांनी महापौरपद भूषविले आहे. सुमन पवळे ह्या स्थायी सभापती होत्या. तर मंगला कदम यांनी महापौरपदासह सत्तारूढ पक्षनेतेपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. आता याच नगरसेविकांनी महापालिकेतील सर्वोच्च पद भूषवून देखील स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी अर्ज केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या सदस्य निवडीचे पूर्ण अधिकार सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहेत. त्यांच्या आदेशानंतरच या नव्या सदस्यांची निवड महासभेत होणार आहे.
स्थायी समिती सदस्यपदासाठी राष्ट्रवादीकडून खालील इच्छुकांनी अर्ज केलेत.
०१. राजू बनसोडे
०२. माई काटे
०३. निकीता कदम
०४. सुलक्षणा शिलवंत-धर
०५. शाम लांडे
०६. रोहित काटे
०७. उषा काळे
०८. अपर्णा डोके
०९. शितल काटे
१०. पौर्णिमा सोनवणे
११. मंगला कदम
१२. वैशाली घोडेकर
१३. संगीता ताम्हाणे
१४. समीर मासुळकर
१५. प्रविण भालेकर
१६. विक्रांत लांडे
१७. सुमन पवळे
























Join Our Whatsapp Group