पिंपरी (Pclive7.com) :- राज्यातील सर्व रक्तपेढ्याकडे आज मिळून फक्त १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षित पद्धतीने रक्तदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पै.अमरभाऊ फुगे युथ फाऊंडेशनने कोणत्याही प्रकारची गर्दी होऊन न देण्याची काळजी घेत, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
हे रक्तदान शिबीर उद्या शुक्रवारी (दि. २७ मार्च २०२० ते रविवार दि. २९ मार्च २०२०) दरम्यान भोसरीतील भोसरी-दिघी रस्त्यावरील कै. पै. धोंडिबा उर्फ गणपत फुगे क्रिडा संकुल ( विरंगुळा केंद्र ) येथे सकाळी १० ते सायं ६ वाजेपर्यंत होणार आहे.
यासाठी स्वप्नील अरण्य 9049313190, विश्वास देशमुख 7057074959, अजय मानकर 9970800797, सुमित खंडागळे 7775889052 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक पै. अमरभाऊ फुगे युथ फाउंडेशन, जिजाऊ प्रतिष्ठान, मृत्युंजय ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group