पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढविणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने थोड्याच वेळापूर्वी दिलेल्या माहितीनुसार आज तब्बल ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालयं. सकाळी काही संशयितांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. तर, आजपर्यंत ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले हे ६ रुग्ण आहेत. त्यामध्ये २९, ३२, ६३ वर्षाचे तीन पुरुष रुग्ण आहेत. तर, ५३, ५४ आणि ५५ वय वर्ष असलेल्या या तीन महिला रुग्ण आहेत. हे रुग्ण भोसरी, खराळवाडी, गांधीनगर भागातील आहेत. दरम्यान मागील सात दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. आज एकाच दिवशी ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.