पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांसह व्यवस्था करत प्रत्येक प्रभागात मोकळ्या मैदानावर भाजी व फळ विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक २४ थेरगाव मधील आनंदवन येथील क्रीडांगणाच्या मैदानात महापालिकेच्यावतीने फळे व भाजी विक्री केंद्र सुरू होणार आहे. स्थानिक नगरसेविका मायाताई बारणे यांनी या नियोजनाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्यात. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोकन्यायलयचे पॅनेल सदस्य ऋषिकेश रेवणनाथ काशिद उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात कोरण्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन सुरू असताना देखील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने शहरात तब्बल ४६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात भाजी व फळे विक्री केंद्र करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक प्रभागातील मैदानावर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत हे केंद्र उभारण्यात येत आहेत. थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये स्थानिक नगरसेविका मायाताई संतोष बारणे यांनी प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार येथील नागरिकांसाठी आनंदवन मधील क्रीडांगणाच्या मैदानावर हे भाजी व फळ विक्री केंद्र सुरू होणार आहे. त्यानुसार नगरसेविका मायाताई बारणे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत या मैदानाची पाहणी करत भाजी विक्रेत्यांसाठीची जागा तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’साठीची आखणी करून घेतली. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत येथील केंद्रावर भाजी व फळ विक्री सुरू असणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करत भाजी खरेदी करावी. अनावश्यक गर्दी करू नये. घराबाहेर गरज असल्यासच पडावे असे आवाहन नगरसेविका माया बारणे यांनी केले आहे.