पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज दि.१७ सकाळी ११.३० वाजता दिलेल्या अहवालानुसार ४ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यात ३ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील सध्या कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३९ वर पोहचली असून त्यातील ३५ रूग्णांवर वायसीएम तर ४ जणांवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहरात आजपर्यंतच्या एकूण बाधित रूग्णांची संख्या ५२ झाली आहे. १२ जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९९ संशयित रुग्णांच्या घशातील द्रव्यांचे नमुने गुरूवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यात ३ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले हे रुग्ण आहेत. त्यामध्ये १९, ३१, ३३ वय असलेले पुरूष आणि ४२ वय असलेली एक महिला रुग्ण आहे. हे चौघे रुग्ण पीसीएमटी चौक भोसरी व मुळानगर दिघी परिसरातील आहेत.






















Join Our Whatsapp Group