पुणे (Pclive7.com):- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आज पुणे येथील राजभवन येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्याच्या विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.
























Join Our Whatsapp Group