पिंपरी (Pclive7.com):- भाजपाचे ज्येष्ठ नेते व पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी यांचे आज रात्री वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. लाडशाखीय वाणी समाज विकास संस्थेचे माजी अध्यक्ष योगेश वाणी यांचे ते वडील होत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते १९८६ मध्ये निवडून आले होते. भाजपचे ते जुने कार्यकर्ते होते. भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय व संबंध होता. भाजपचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस व शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. मध्यंतरी काही काळ पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. एक उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती होती.
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय-धोरणांबाबत मतभेद झाल्यानंतर ते परत भाजपमध्ये स्वगृही परतले होते. भाजपने त्यांची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. पुढे प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.

























Join Our Whatsapp Group