पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात कचरा संकलन करणा-या कंत्राटी कर्मचा-यांना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यामुळे त्वरित वेतन मिळाले आहे.
महापालिकेच्यावतीने शहरातील कचरा संकलन करणा-या अँन्टोनी एस.आर.एल. कंपनीच्या कंत्राटी कामगरांना पगार न झाल्यामुळे संप केला होता. हा प्रकार विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी जाऊन त्यांनी कामगरांच्या समस्या जाणून घेतल्या.
अखेर राजू मिसाळ यांच्या विनंतीवरुन या कर्मचा-यांनी काम सुरु केले. त्यानंतर राजू मिसाळ यांनी त्या कंपनीच्या वरीष्ठाशी संपर्क साधून या कामगाराचे वेतन त्वरीत देण्याबाबत आदेश दिले. महिन्याची १४ तारीख आली तरी या कष्टक-या कामगारांचा पगार अजून का केला नाही असा जाब विचारला. व यास जबाबदार कोण? सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलनाचे काम जीव धोक्यात घालून करीत असताना या कर्मचा-यांचा पगार न झाल्यामुळे एक दिवसात वेतन देण्याबाबत बजावले.
एक दिवासात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. येथून पुढे वेळेवर वेंतन देण्याबाबत त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिका-यांना सुनावले. विरोधी पक्षनेत्यांनी या कामगारांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासनही दिले.

























Join Our Whatsapp Group