पिंपरी (Pclive7.com):- ऑलम्पिकवीर पै.खाशाबा जाधव यांच्या जन्मदिना निमित्ताने मान अभिमान फाउंडेशनच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील ७ क्रीडा शिक्षक, खेळाडूंना पै.खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन येथे संपन्न झाला.यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह (अण्णा), साताराचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, क्रीडा तपस्वी बाळासाहेब लांडगे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.अरुण पिसाळ आदी क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पिंपरी चिंचवड मधून साहेबराव जाधव, राजेंद्र पितलीया, रामेश्वर हराळे, मिलिंद माथने, भट्टू शिंदे, आरती काळभोर समाजभूषण पुरस्कार आदेश नवले यांना देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे सरचिटणीस क्रीडा तपस्वी बाळासाहेब लांडगे यांना प्रभाकर देशमुख यांचे हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब लांडगे म्हणाले कुस्ती क्षेत्रातील खेळाडूंना शासनात नोकरी, मानधनात वाढ तसेच पहिले ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पदमभूषण मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड मधील हॅन्डबॉल संघटनेचे मुकेश पवार, सत्यवान वाघमोडे, सचिन नाडे, रवींद्र पवार, सुधीर जाधव, अमर देशमुख उपस्थित होते.