शुभ योगामध्ये होत आहे फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या गुरुवारची सुरुवात. पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रहस्थितीचा लाभ १२ पैकी ६ राशीच्या लोकांना होईल. या व्यतिरिक्त इतर ६ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
मेष : शुभ रंग : मरून : अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. भावंडांत सामंजस्य राहील.
वृषभ : शुभ रंग : भगवा : अंक : १
कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.
मिथुन : शुभ रंग : चंदेरी : अंक : ८
मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी सामंजस्य राहील.
कर्क : शुभ रंग : गुलाबी : अंक : ९
काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. बचत आज जमणार नाही. घरातील थोर हट्टीपणाने वागतील.
सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : ७
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. आज तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.
कन्या : शुभ रंग : सोनेरी : अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र अाश्वासने पाळणार नाहीत.
तूळ : शुभ रंग : आकाशी : अंक : ५
नोकरीत बिनचूक कामास प्राधान्य द्या. रिकाम्या गप्पांतून फक्त गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी : अंक : ६
काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा. मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील.
धनु : शुभ रंग : पिस्ता : अंक : २
तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.
मकर : शुभ रंग : पांढरा : अंक : ३
मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. क्रोधावर लगाम गरजेचा.
कुंभ : शुभ रंग : मोरपंखी : अंक : ४
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. उत्साही दिवस.
मीन : शुभ रंग : निळा : अंक : १
काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलिंग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.मातोश्रींकडून लाभ संभवतो.